- तमसो मा ज्योतिर्गमय
श्री शाहू शिक्षण संस्था संचलित
गंगाबाई गोब्बी अध्यापक विद्यालय जत .
खूप दिवस झालं माझ्याकडे असणारे फोटो आपणा सर्व मित्रांकडे पोहोचवावेत असं मला वाटत होतं. काही मित्रांनी आपल्या ग्रुप वर तसे फोटो शेअर केले होते .पण मला वाटलं मि जो नव्यानेच ब्लॉग लिहायला चालू केला आहे. त्यामध्ये जर का आपण या वेगवेगळ्या प्रसंगातील फोटो जर का शेअर केले तर जरा वेगळच राहील. व हे फोटो कधीही कोणत्याही प्रसंगी कोणालाही उपलब्ध होतील म्हणून...
क्रिडा स्पर्धा सांगली
प्रथम मला खूप आवडणारा विषयी म्हणजे खेळ त्यामधील माझा इव्हेंट धावणे. तर यानिमित्ताने माझ्याकडे असणारे वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेतील काही फोटो आहेत तसेच काही आठवणी आहेत. प्रथम मला वाटतं सांगली येथे स्पर्धा होत्या व मुलींचा कबड्डी सामना चालू होता व तिथे आपल्या एका मॅडमला दुखापत झाली. (पाय फॅक्चर झाला). तो प्रसंग मला अजून चांगला आठवतो आहे. तसेच कवठेमहांकाळ येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मी 800 मीटर धावणे या प्रकारामध्ये धावत होतो, पण शिवानंद पुजारी सर यांना 800 मीटर म्हणजे ट्रॅॅॅकला दोन वेडे काढायचे आहेत हे माहित नव्हतं ,व जेव्हा मी स्पर्धा जिंकून आलो तेव्हा सर म्हणाले ,मला वाटलं पहिल्या ट्रॅॅॅकला चौथ्या नंबरला होतास, म्हणजे तुझा पहिला नंबर गेला ,पण परत दुसरा राउंड धावत असताना शेवटच्या 200 मीटर पासून मी वेगाने धावाण्या्स सुरुवात केली व शेजारी असणारे आपल्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी यांच्या चिअर केल्यामुळे मी विजय झालो.
फनी गेम
फनी गेम
कॉलेजमध्ये घेतलेला हा दुसरा एक इव्हेंट, त्यामध्ये भदाणे सर ,पांढरे सर व मी सहभाग घेतला होता, प्रत्येक खेळाडूसाठी प्रवेश फ्री होती व त्याचा चॉकलेट देत होतो.फनी गेम मधून काही रक्कम आम्ही मिळवली.
संचलन
मला आठवते त्याप्रमाणे हा फोटो सनमडीकर डी.एड कॉलेज येथील आहे .आपल्या सर्व खेळाडूंचा गट ध्वजाला मानवंदना देताना.
वेशभूषा
वेशभूषा
वेशभूषा मध्ये पुजारी सर ,पांढरे सर व मि धनगरी पोशाखांमध्ये दिवसभर होतो. त्यामध्ये डोक्याला फेटा हातात काठी ,खांद्यावर घोंगडी व पायात चप्पल असा पोषाख आम्ही केला होता.
स्वच्छता
स्वच्छता
बनाळी बनशंकरी येथे घेण्यात आले, स्वच्छता शिबिर त्यामध्ये दररोज परिसर स्वच्छ करणे .व जेवण वगैरे करून दुपारची विश्रांती घेणे असा कार्यक्रम होता हा कालावधी एकदम आठवणीत राहील असा . परिसर अतिशय सुंदर गर्द झाडीने नटलेला, अशा ठिकाणची काही क्षणचित्रे.वनभोजन
बनशंकरी बनाळी येथील काही फोटो.
मी एक छोटासा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आहे.याची सुरुवात मला वाटलं आपल्याा काही आठवणीतून करावी व फोटोही शेअर करावेत .की जे कायम कोणालाही माझ्या ब्लॉग वर मिळतील .मला वाटतं कोणीही नाराज होऊ नका कारण माझ्याकडे जेवढे फोटो आहेत तेवढेे सर्व मी शेअर केले आहेत. फोटो काढताना काही व्यवस्थित नसतील तर समजून घ्या. त्याचप्रमाणे त्या वेळच्या काही आठवणीही माझ्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .
धन्यवाद!!!


Khup chan sir
ReplyDeleteरुधय भरून येते मला अस वाटतंय की मित्रां जावं आणि मन भरून रडाव कारण मित्रांनी खूप प्रेम दिलंय मी तर आता लांब आहे आता कधी चुकून भेट होते भगवंताला ठाऊक चूक भूल माफ असावी
ReplyDelete*जुन्या आठवणी *
ReplyDeleteअचानकच कधीतरी
जुन्या आठवणी जागा होतात
अलगत उचलून आपल्याला त्या
सोनेरी दुनियेत घेऊन जातात
जुन्या आठवणी आठवल्या की
मन कस हळवं होत
हसता-हसता डोळ्यांमधे
नकळत कुठून अश्रू येत
हसू येत आता
ज्या गोष्टी साठी राडलो होतो
अन् रडू येत
ज्यावर पोटभरूण हसलो होतो
भोगून झालेली शिक्षाही आता
का गोड वाटायला लागते
कारण बहुतेक त्याचा गोड शेवट
आपण अगोदरच बघितलले असते
जुन्या आठवणी,जुने मित्र
सारे कस लक्ख आठवत
त्याच आठवणी त्याच विश्वामद्धे
पुन्हा-पुन्हा जगावास वाटत
अस मात्र काहीच नाही
की आता घडताय ते सगळाच वाईट
नि जून तेच सोन होत...
आज जगलेले दिवस सुद्धा
कधीतरी जुने होतील
आणि नकळत पुन्हा कधीतरी
हेही दिवस सोनेरी वाटतील
जगत चाललेल्या दिवसा पेक्षा
जगलेले दिवस चांगले वाटतात
जस झालेल्या परीक्षेपेक्ष्या
येणार्या परिक्षा कठीण वाटतात
आठवणींचा हा फेरा
असाच सुरू राहणार
पिक्चर चांगले शूट करत राहा
म्हणजे नंतर बघायलाही मज़ा येणार...
Bappa majya jiva bhavachya mansana udand ayush de, tuje laksh tyanchyvar ayushbhar asech rahu de, sarvana samadhanat thev hich prathana
DeleteShivanand..
Nice sir
ReplyDeleteNice sir
ReplyDelete