Wikipedia

Search results

Monday, July 13, 2020

आठवणी

  •             तमसो मा ज्योतिर्गमय  
      श्री शाहू शिक्षण संस्था संचलित 
 गंगाबाई गोब्बी अध्यापक विद्यालय जत .
         खूप दिवस झालं माझ्याकडे असणारे फोटो आपणा सर्व मित्रांकडे पोहोचवावेत असं मला वाटत होतं. काही मित्रांनी आपल्या ग्रुप वर तसे फोटो शेअर केले होते .पण मला वाटलं मि जो नव्यानेच ब्लॉग लिहायला चालू केला आहे. त्यामध्ये जर का आपण या वेगवेगळ्या प्रसंगातील फोटो जर का शेअर केले तर जरा वेगळच राहील. व हे फोटो कधीही कोणत्याही प्रसंगी कोणालाही उपलब्ध होतील म्हणून...
क्रिडा स्पर्धा सांगली 
    प्रथम मला खूप आवडणारा विषयी म्हणजे खेळ  त्यामधील माझा इव्हेंट धावणे. तर यानिमित्ताने माझ्याकडे असणारे वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेतील काही फोटो आहेत तसेच काही आठवणी आहेत. प्रथम मला वाटतं सांगली येथे स्पर्धा होत्या व मुलींचा कबड्डी सामना चालू होता व तिथे आपल्या एका मॅडमला दुखापत झाली. (पाय फॅक्चर झाला). तो प्रसंग मला अजून चांगला आठवतो आहे.  तसेच कवठेमहांकाळ येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मी 800 मीटर धावणे या प्रकारामध्ये धावत होतो, पण शिवानंद पुजारी सर यांना 800 मीटर म्हणजे ट्रॅॅॅकला दोन वेडे काढायचे आहेत हे माहित नव्हतं ,व जेव्हा मी स्पर्धा जिंकून आलो तेव्हा सर म्हणाले ,मला वाटलं पहिल्या ट्रॅॅॅकला चौथ्या नंबरला होतास, म्हणजे तुझा पहिला नंबर गेला ,पण परत दुसरा राउंड  धावत असताना शेवटच्या 200 मीटर पासून मी वेगाने धावाण्या्स  सुरुवात केली व शेजारी असणारे आपल्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी यांच्या चिअर केल्यामुळे मी विजय झालो.
फनी गेम
     कॉलेजमध्ये घेतलेला हा दुसरा एक इव्हेंट, त्यामध्ये भदाणे सर ,पांढरे सर व मी सहभाग घेतला होता, प्रत्येक खेळाडूसाठी प्रवेश फ्री होती व त्याचा चॉकलेट देत होतो.फनी गेम मधून काही रक्कम आम्ही  मिळवली.
 प्रभात फेरी 
प्रभात फेरीतील एक फोटो इथे शेअर केलेला आहे.

संचलन 
  मला आठवते त्याप्रमाणे हा फोटो सनमडीकर डी.एड कॉलेज येथील आहे .आपल्या सर्व खेळाडूंचा गट ध्वजाला मानवंदना देताना.
वेशभूषा 
      वेशभूषा मध्ये पुजारी सर ,पांढरे सर व मि धनगरी पोशाखांमध्ये दिवसभर होतो. त्यामध्ये डोक्याला फेटा हातात काठी ,खांद्यावर घोंगडी व पायात चप्पल असा पोषाख आम्ही केला होता.
लेेझीम
प्रभात फेरी साठी जत मधून जाताना लेझीम होते. व त्यासाठी शिंदे सरांनी खूप मेहनत घेऊन लेझीम बसवली होती.

स्वच्छता 
  बनाळी बनशंकरी येथे घेण्यात आले, स्वच्छता शिबिर त्यामध्ये दररोज परिसर स्वच्छ करणे .व जेवण वगैरे करून दुपारची विश्रांती घेणे असा कार्यक्रम होता हा कालावधी एकदम आठवणीत राहील असा . परिसर अतिशय सुंदर गर्द झाडीने नटलेला, अशा ठिकाणची काही क्षणचित्रे.वनभोजन 
व या स्वच्छता  उपक्रमाची सांगता छानशा जेवणाने करताना सर्व प्राध्यापक व छात्र अध्यापक.
निसर्गभेेटी
बनशंकरी बनाळी येथील काही फोटो.
धन्यवाद मित्रांनो !!
 मी एक छोटासा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आहे.याची सुरुवात मला वाटलं आपल्याा काही आठवणीतून करावी व फोटोही शेअर करावेत .की जे कायम कोणालाही माझ्या ब्लॉग वर मिळतील .मला वाटतं कोणीही नाराज होऊ नका कारण माझ्याकडे जेवढे फोटो आहेत तेवढेे सर्व मी शेअर केले आहेत. फोटो काढताना काही व्यवस्थित नसतील तर समजून घ्या. त्याचप्रमाणे त्या वेळच्या काही आठवणीही माझ्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .
        धन्यवाद!!!

Monday, July 6, 2020

गेले ते दिवस

     खूप दिवस झाले. आपणास भेटावे. पहिल्याप्रमाणे खेळावे, बोलावे, खूप -खूप मज्जा करावी,भांडण करावं ,एकमेकाला मारामारी करावी ,मातीत वाळूत खेळावं बसावं वाटतं ,पण परत वर्तमानत आल्यावर, हे शक्य आहे का ?असा मनात विचार येतो आणि मग आपण वर्तमानात जगू लागतो .आणि आठवतात त्या फक्त आठवणी ते दिवस खूप चांगले होते ना ? संसाराचा व्याप ,कामाची काळजी काही काही नव्हतं. लहानपणी असं वाटायचं की, मोठा झाल्यावर हे होईल ,मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल ,इंजिनीयर होईल सैन्यात जाईन. एखाद्या मोठ्या माणसाचा आदर्श आपल्या पुढे असतो आणि मी तसंच होईल असे आपल्याला वाटत राहते .पण आता या जागी आल्यानंतर आपल्याला वाटते की आपण खूप लांब आलो ,खूप दूर आलो .जीथ होतो तिथं खूप समाधानी होतो ,आनंदी होतो .कवी नी म्हणून ठेवले की ''लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर.....

मुख्याध्यापक -श्री पाटील सर 
सहकारी शिक्षक 
काशीद सर -मराठी 
बिराजदार सर - हिंदी 
निकम सर - भूगोल 
कुलकर्णी सर - इंग्रजी 
कडीमाळी सर-   शारीरिक शिक्षण 
खंडागळे सर -हिंदी 
वाघमारे सर -इंग्रजी 
भोसले सर -हिंदी, चित्रकला 
वनखंडे मॅडम- मराठी 
कांबळे मॅडम - गणित 
या सर्वांची खूप खूप आठवण येते सुरुवातीला गावामध्ये भरणारे वर्ग पाचवी,सहावी,सातवी .
पाचवीचा वर्ग -विठ्ठल मंदिरामध्ये
 सहावीचा वर्ग -आवटे वाड्यामध्ये 
सातवी वर्ग- पाटील वाड्यामध्ये 
असेे वर्ग भरायचे. वाजवलेली बेलची आवाज पूर्ण गाव भर ऐकू यायची .तेव्हाचा आमचा आवडता खेळ चोर-पोलीस. खेळताना आम्ही पूर्ण गावांमध्ये धावायचो .कोणाच्या घरामध्ये ,पडलेल्या जुन्या बांधकामात, नवीन बांधकाम,असो जनावरांचे गोठे, दुकानाचा आडोसा .अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी आम्ही लपून बसायचं आणि सर्व गावभर पोलीस आम्हाला  शोधायचे .मात्र बेल झाली की आम्ही धावत शाळेत जायचं .मला आठवते की भोसले सरांनी विठ्ठल मंदिरामध्ये भरलेल्या वर्गात सर्व मुलांना दंगा केल्यामुळे बेंचवर उभा करून पायाच्या पिंडरीवर छडीने मारले होते. मात्र भोसले सरांचा चित्रकला खूप छान होता. सुंदर होता. वनखंडे मॅडम हस्ताक्षर सुंदर येण्यासाठी शाहीची पेन वापरा असं सांगायच्या,  पण अजूनही माझे अक्षर काही सुधारले नाही. सातवीचा वर्ग पाटील वाड्यावर वरच्या  मजल्यात भरायचा. वर्गाबाहेर थोडा टेरेस होता.तेथे बसायचे .रोड वरून जाणारे येणारे सर्वच व्यवस्थित दिसायचे .रोड वरून येणारे शिक्षक पाहिले की लगेच वर्गात जाऊन बसायचं .मला एकदा आठवतय गॅदरिंग घ्यायचा विषय चालला होता, व वनखांडे मॅडमनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर नाटक बसवायची तयारी केली होती. पुढचा महत्वाचा म्हणजे आम्ही पाचवीला असल्यापासून आम्हाला सांगितलं जायचं की पुढच्या वर्षी शाळा नवीन बांधकामामध्ये माळावर भरणार आहे. पण आम्ही दहावीला असताना त्या बांधकामाला पाणी मारले मग कधी जाणार त्या वर्गात बसायला तर आठवड्यातून एकदा-दोनदा माळावर सर्व मुले घेऊन ओळीने आम्ही जायचं .ज्या दिवशी माळावर जायचे फिक्स असते ते अगोदरच आम्हाला सर सांगायचे .मग सुर-फाट्या खेळण्यासाठी तिथेच गडी घेतले जायचे, व मुली विरुद्ध मुले आसा खेळ मग रंगायचा . इंग्रजी वाचन,यामुळे  कुलकर्णी सरांचा एकदा जोराचा मार खाल्लेला  अजून चांगला आठवतोय मला  तसेच ,दहावी मध्ये  नाईट च्या मुलांनी  काही दंगा केला  व खूप मुलांना  बाहेर काढलं  व पालकांना बोलावून आणायला सांगितले .असे शिक्षण घेत घेत आम्ही दहावीला गेलो दहावीचे वर्ष म्हणजे बोर्डाची परीक्षा ,म्हणून जोराचा अभ्यास सुरू झाला .मग मुलांना नाईटला अभ्यासासाठी शाळेत बोलवायचे .मला तर आठवते की मी,गोरख,नवनाथ अजून एक-दोघं वर्षभर शाळेत नाईटला होतो. दिवाळीच्या सुट्टीत देखील नववीच्या वर्गात आम्ही परमिशन घेऊन राहिलो होतो.मग असे करत वर्ष संपत आले  .बोर्डाची परीक्षा
सोन्याळ येथे दररोज पेपरला जायचे योगायोग म्हणजे परीक्षेमध्ये रंगपंचमी आली होती .मग टेम्पो मध्येच सण साजरा झाला .सरतेशेवटी जेव्हा निरोप घ्यायची वेळ आली, तेव्हा सर्वच मुले व मुली खूप ओक्साबोक्षी रडालो होतो. मला वाटते ते अश्रू अजूनही आठवतायहेत.
🤝🤝🤝🤝🤝🤝
माझ्याकडे होते तेवढे फोटो शेअर करत आहे. आनखी दोन फोटो सापडले नाहीत. व मला आवडलेले दोन प्रसंग शेअर करत आहे.